मोबाईलवर बोलण्याचं काही तारतम्य आहे की नाही...., long mobile conversation cause to brain tumour

मोबाईलवर बोलण्याचं काही तारतम्य आहे की नाही....

मोबाईलवर बोलण्याचं काही तारतम्य आहे की नाही....

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अरे मोबाईलवर किती वेळ बोलावं? याचं काही तारतम्य आहे की नाही? असे आवाज आपल्याला अनेक घरांतून सर्रास ऐकायला मिळतात... `अॅडिक्ट` झाल्यासारखं मुलं, काही वेळा मोठी माणसंही तासनतास मोबाईलवर बोलताना दिसतात... पण, ही नशा तुम्हालाही लागली असेल तर थांबा... कारण, हे तुमच्या आरोग्यासाठी धोकायदायक आहे.

एका नव्या संशोधनामुळं धोक्याचा इशारा समोर आला आहे. दररोज अर्धा तास मोबाइलचा वापर पाच वर्षे केल्यास ब्रेन कॅन्सरचा धोका तिपटीने वाढतो असं एका फ्रेंच अभ्यासाद्वारा समोर आलं आहे. सरासरी दर महिन्याला 15 तास मोबाइल फोनचा वापर करणार्‍यांना ब्रेन टय़ूमर होण्याचा धोका दोन ते तीन पट अधिक असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. बोर्डऑक्स विद्यापीठानं केलेल्या एका अभ्यासातून याआधीच्या आंतरराष्ट्रीय संशोधनाला पुष्टी दिली आहे.

मोबाइल फोनचा वापर करणार्‍यांध्ये ब्रेन टय़ूमर होण्याची जोखीम अधिक असते असं या आधीही अनेक संशोधनातून समोर आलं आहे. मोबाइलचा वापर आणि कॅन्सर होण्याबाबत ठोस पुरावा अभ्यासातून स्पष्ट झाला नसला, तरी दीर्घकाळ वापराने ब्रेन टय़ूमरची शक्यता वाढते असं यातून समोर आलं आहे.

संशोधकांनी 2004 ते 2006 या कालावधीत ब्रेन टय़ूमरच्या रुग्णांची तुलना सुदृढ व्यक्तींशी केली, त्यातून या भीतीला दुजोरा मिळाला आहे. पण यात काही त्रुटीही आढळून आल्या आहेत. याआधीच्या संशोधनाचा प्रतिवाद करताना फोनचा वापर मेंदूच्या ज्या बाजूने केला जात असे त्याच्या विरुद्ध बाजूला कॅन्सरचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलं. त्यामुळं मोबाइलचा अतिवापर करणार्‍यांनो जरा सावधान.!


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 24, 2014, 08:02


comments powered by Disqus