Last Updated: Wednesday, January 23, 2013, 16:53
www.24taas.com,लंडनआपल्याला टेंशन आलेय का? नेहमी तणावाचा सामना करावा लागतोय का? तुम्ही चलबिचल आहात का? तुमची शांतता भंग पावलेय का? यावर एक उत्तम उपाय आहे. तो म्हणजे `जादू की झप्पी` (प्रेमाने मिठ्ठी मारणे)
आपल्याला प्रेम जपायचे असेल तर आलिंगन देणे केव्हाही चांगले. आलिंगन दिल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला प्रभाव दिसून येतो. आपल्याला आलेला तणाव त्याने दूर होण्यास मदत होते. तसेच आपली स्मरण शक्ति वाढण्यास मदत होते. यामुळे होते काय, तर तणाव कमी होण्यास मदत होते.
संशोधकांनी एका केलेल्या सर्वेक्षणात आलिंगन दिल्याने तणाव कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यावेळी आपण तणावाखाली असाल त्यावेळी आपल्या सहकाऱ्याशी किंवा जोडीदाराला घट्ट मिठ्ठी मारणे चांगले. अथवा गळा भेट घेणे चांगले असते. त्यामुळे आपल्या रक्तातील हार्मोन्स ऑक्सीटोसीनचा स्राव होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. यामुळे आपला तणाव कमी होतोच. शिवाय बैचनी कमी होते. त्यामुळे आपली गेलेली स्मरण शक्ति पुन्हा सक्रीय होते आणि आपण तणाव विहरीत राहतो.
व्हिएना विश्वविद्यालयातील संधोनकर्तांनी धोक्याची सूचना दिली आहे. आपण ज्या व्यक्तीला चांगले ओळखतो त्याच व्यक्तीशी गळाभेट घेणे चांगले. अनोळखी व्यक्तीला मिठ्ठी मारली तर त्याचा उलटा प्रभाव होवू शकतो, याची प्रत्येकांने काळजी घेणे महत्वाचे आहे.
आई-वडील, मुल आणि दाम्पत्य यांच्यातील प्रेम हे अलिंगन दिल्याने अधिक वाढते. त्यांच्या नात्यातील प्रेम आलिंगन दिल्याने अधिक वृद्धिंगत होते. प्रामुख्याने जोडीदाराबरोबर आलिंगन दिल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.
महिलांचा तणाव कमी होण्यास अनेक कारणे आहेत. मुलाला जन्म देताना तसेच स्तनपान करण्याच्यावेळी रक्तातील हार्मोन्सचा स्राव होतो. त्यामुळे आई आणि मुलातील प्रेम अधिक वाढते.
आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीशी तसेच मित्रांना आलिंगन दिल्याने त्यांच्यातील प्रेमाचा ओलावा वाढतो शिवाय त्यांच्यातील कटूता संपते. त्यामुळे दोन्ही व्यक्ती खूश होतात. यातून तणाव कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे दोन्ही व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवू लागतात.
दरम्यान, `जादू की झप्पी`साठी एकाच व्यक्तीची ईच्छा असेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. उलट तणाव वाढण्यास अशी भेट कारणीभूत ठरते, हे प्रत्येकांनी लक्षात घेतले पाहिजे.
First Published: Wednesday, January 23, 2013, 16:19