Last Updated: Sunday, July 14, 2013, 17:44
www.24taas.com, झी मीडिया, भोपाळदारू पिणं हे नेहमीच चुकीचं मानलं जातं. तसंच दारूचे दुष्परिणामही सर्वांना माहित आहेत. मात्र, मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथे बनवली जाणारी आंब्याची दारू ही सर्दी, खोकला, न्युमोनियाने त्रस्त लहान मुलांसाठी सामबाण उपाय ठरत आहे. कारण या दारूच्या मालिशमुळे रुग्णांचे जार दूर पळून जात आहेत.
अलिराजपूर येथील जोबट कसबा भागात आंब्याची दारू तयार केली जाते. ऊर्ध्वपतन पद्धतीने ही दारू तयार केली जाते. गंमत म्हणजे ही दारू पिण्यासाठी नसून अंगाच्या मालिशसाठी आहे. ही दारू तयार करणाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे. या दारूने छाती, पाठ तसंच हाता-पायांची मालिश केल्यास एक ते दोन दिवसांमध्ये संपूर्ण कफ बाहेर पडतो. या दारूत हानीकारक असणारे इथाइल, मिथाईल सारखे पदार्थ मिसळले जात नाहीत.
आंब्याची दारू बनवण्यासाठी आमरसाचा वापर केला जातो. तो एका भांड्यात तो तापवला जातो. त्यातून निघालेली वाफ नळीद्वारे दुसऱ्या भांड्यात एकत्र केली जाते. ही प्रक्रिया तीन ते चार वेळा केल्यानंतर आंब्याची दारू तयार होते. या दारूच्या मालिशमुळे लहान बालकांचं आरोग्य सुधारण्यास मदत झाली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, July 14, 2013, 17:44