Last Updated: Monday, February 4, 2013, 16:06
www.24taas.com,वॉशिंग्टननव्याने केलेल्या अभ्यासानुसार दूध आणि दहीमुळे हाडे मजबुत होतात हे स्पष्ट झालेय. कमी फॅक्टचे दूध आणि दही या पदार्थामुळे प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते.
हार्वर्ड विश्वविद्यालय संलग्न असणाऱ्या एका इंस्टीट्यूट फॉर एजिंग रिसर्च (आईएफएआर) च्या शिवानी साहनी याबाबत स्पष्ट केले. दूध आणि दही या पदार्थामुळे प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते. दुधापासून बनविलेले पदार्थ शरिरासाठी पोषक तत्व पुरवतात. याचा फायदा आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी होतो, असे शिवानी साहनी सांगतात.
क्रिम मिसळलेल्या दुधात कमी प्रमातात पोषक घटक असतात. दुधापासून बनविलेले क्रिमचे पदार्थ आणि आइस्क्रिम या सारख्या पदार्थात फॅक्ट आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. रोज दही आणि दूध घेणाऱ्यांची हाडे मजबुत होतात. तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहते, असे केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
अभ्यास करणाऱ्यांनी ३२१२ लोकांची पाहाणी केली. त्यांची खाण्याची आदत याचा अभ्यास केला गेला. त्यासाठी एक प्रश्नावली त्यांच्याकडून भरून घेण्यात आली. यातून हाती आलेल्या आकडेवारीवरून दुग्धजन्य पदार्थांमुळे शरिरातील हाडांवर चांगला प्रभाव दिसून आला.
करण्यात आलेल्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे की, पौष्टीक खाद्य पदार्थांमुळे हाडांसंबंधी रोगांचा सामना करण्यास मदत मिळते किंवा सहाय्य होते.
First Published: Monday, February 4, 2013, 13:50