Last Updated: Wednesday, June 26, 2013, 07:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई संगीताला ईश्वराचा दर्जा दिला गेलाय. सात कोमल स्वरांच्या माध्यामातून मन प्रसन्न करण्याचं हे एक तंत्र आहे. शरीर आणि मनाच्या आनंदी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे योगाचा वापर केला जातो तसंच संगीत आपल्या आत्म्याला आनंदी ठेवण्याचं काम करतं.
केवळ मनोरंजन केवळ हाच संगीताचा उद्देश नाही. निर्मळ संगीत मग ते कोणत्याही भाषेतलं असो किंवा कोणत्याही वाद्यातून निर्माण केलेलं ते शुद्धता आणि पवित्रतेवरच भर देतं.
निरोगा काया ही मानवाच्या जीवनातलं एक आवश्यक असं सुख मानलं गेलंय. पण, निरोगी शरीराबरोबरच निरोगी मनही आवश्यक असतं. त्यासाठी संगीताची उपासना हाही एक उपाय मानला गेलाय. शरीर आणि मन आनंदी असेल तर आपण जीवनाचा पूरेपूर आनंद घेऊ शकतो.
संगीताच्या रियाजासाठी एकाग्र मनाची आवश्यकता असते तसंच स्वरांच्या शुद्धतेवर यामध्ये जोर दिला जातो. गायन असो वा वादन... मनापासून कला सादर करणारा कलाकार एकाच अवस्थेत तासनतास बसून राहताना दिसतील. एकप्रकारे योगासनं आणि संगीत एकमेकांना पूरक आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण दोघांमध्येही मनुष्य एकाग्र आणि प्रसन्न मनानं काम करताना दिसतो.
संगीत साधना आणि योग साधना या दोहोंमुळे मनुष्याच्या जीवनात आनंद येतो, यावर वैज्ञानिकांनीही शिक्कामोर्तब केलंय. कोणत्याही प्रकारच्या तणावांपासून दूर राहणं साध्य तुम्ही या माध्यमातून करू शकता आणि मुख्य म्हणजे संगीताचा आनंद तुम्ही घरामध्ये, गच्चीवर, रस्त्यावर, बगीचामध्ये, सकाळी संध्याकाळी चालताना किंवा रात्री झोपण्याच्या अगोदरही घेऊ शकता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 26, 2013, 07:55