Last Updated: Monday, August 20, 2012, 23:10
www.24taas.com, लंडनयेत्या दोन वर्षांत टक्कलावर केस येणाची एक नवीन शक्कल अस्तित्वात येणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञ सध्या अशा एका लोशनवर काम करीत आहेत, की जे लावल्याने टक्कल पडण्यासाठी कारणीभूत ठरणारे एन्झाइमच्या प्रभावावर नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यामुळे टक्कलाची समस्या दूर होणार आहे.
हे उत्पादन तयार करण्यासंदर्भात एका फार्मास्युटिकल कंपनीशी चर्चा सुरू आहे.
प्रोस्टॅग्लॅन्डाइन डी २ (पीजीडी २) नावाचे एक एन्झाइम अमेरिकेचे त्वचा रोग तज्ञांनी शोधले आहे. हे एन्झाइम केस उगविण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करते.
केस गळण्यासंबंधी २५० जीन्सचाही शोध यावेळी लागला आहे,
First Published: Monday, August 20, 2012, 23:10