Onions have sex moves -24taas.com

सेक्सचा वांदा, दूर करणार कांदा

सेक्सचा वांदा, दूर करणार कांदा
www.24taas.com,मुंबई


आपण लैंगिक जीवनात सुखी नसाल तर दु:खी होवू नका. लैंगिक आनंद मिळविण्यासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला हवा असे काही नाही. कारण आर्युवाद यावर उपाय सांगितला आहे. आपल्या घरगुती वापरात असलेल्या काही गोष्टींचा लैंगिक जीवन आनंदी करण्यासाठी उपयोग होवू शकतो. हळद, धने किंवा काळी मिरची, अद्रक (आलं) या सर्व पदार्थात भरपूर औषधीय गुणधर्म आहेत. यामध्ये भर पडली आहे ती कांद्याची.

कांदा हा जेवणात फक्त चवीचे काम करतो असे नाही. कांद्याने अपचन आणि अरुची दोन्ही गोष्टीत फायदा होतो. आहार विशेषज्ज्ञ सांगणे आहे की, कांदा सेक्समधील दुर्बलता कमी करण्यात मदत करतो. सुखी आणि संतुष्ट वैवाहिक जीवनासाठी संभोग शक्ती प्रबल असणे आवश्यक आहे. त्यासाठी कांद्याचे सेवन केल्याने फायदा होतो. यौन शक्तीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कांदा हा एक उत्तम पर्याय आहे.

सेक्सची वृध्दी वाढविण्यासाठी तुम्ही काय कराल?

कांद्याचा एक चमचा रस, अर्धा चमचा मधाचे मिश्रण घेतल्याने वीर्य वाढते. कांद्याचे हे उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.

पांढ-या कांद्याचा रस, अद्रकाचा रस तसेच मध, शुद्ध तूप हे सर्व पाच-पाच ग्रॅम समप्रमाणात घेऊन यांचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण सकाळी नियमित एक महिनाभर घ्या आणि लाभ पाहा. या मिश्रणाने यौन क्षमतेत अभूतपूर्व वृद्धी होते.

कांद्याचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन सरबतासारखे द्रव्य मिश्रण तयार करा. हे मिश्रण दहा ते पंधरा ग्रॅम प्रमाणात नियमित सेवन अकरा. या प्रयोगाने निश्चितच यौन स्फूर्ती मिळते.

सेक्सचा वांदा, दूर करणार कांदा

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी कांद्याचा सोपा प्रयोग आहे. लाल कांदा पन्नास ग्रॅम, शुद्ध तूप पन्नास ग्रॅम हे सर्व अडीचशे ग्रॅम गरम दुधात मिसळून याचे चाटण करावे. कांद्याला रगडून गुळ टाकून खाल्याने वीर्य वाढते.

ज्यांना शीघ्रपतन (प्री-मेच्युर इजेकुलेशन) समस्या आहे, त्यांनी अडीच ग्रॅम मध आणि तेवढाच कांद्याचा रस यांचे मिश्रण घ्यावे. याचा उपयोग हिवाळ्यात दिवसातून दोन ते तीन वेळेस करावा.

एक किलो कांद्याचा रस, एक किलो मध त्यामध्ये अर्धा किलो साखर मिसळून एका स्वच्छ डब्यात ठेवा. आता महिनाभर पंधरा ग्रॅम प्रमाणात या मिश्रणाचे नियमित सेवन करा. हा उपाय केल्याने सेक्स प्रक्रियेत वाढ होते.


एक किलो कांद्याच्या रसामध्ये अर्धा किलो उडदाची डाळ मिसळून त्याचे पीठ करून वाळवून घ्या. वाळल्यानंतर त्या पिठीला परत एक किलों कांद्याच्या रसामध्ये परत एकदा मिसळून त्याचे वाळवून पीठ करा. आता हे पीठ दहा ग्रॅम प्रमाणात घेऊन म्हशीच्या गरम दुधात टाकून इच्छेनुसार साखर टाकून प्या. हा प्रयोग सलग तीस दिवस सकाळ-संध्याकाळ करा. हा उपाय केल्याने सेक्स शक्ती वाढेल.

First Published: Saturday, August 18, 2012, 16:24


comments powered by Disqus