Last Updated: Saturday, October 27, 2012, 18:42
www.24taas.com, वॉशिंग्टनतुम्हाला जर पान खाण्याची सवय असेल तर ती सोडली पाहिजे. पान खाण्यामुळे कॅन्सर होवू शकतो, हे संशोधनानंतर स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जेवण केल्यानंतर पान खायची सवय असेल तर काही अपायकारक गोष्ट ठरून तुमच्या जीवावर बेतू शकते, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कॅन्सरपासून सुटका होण्यासाठी पानं खाणं टाळा. एका संशोधनात असं समोर आलयं की पानं चघळल्यानं किंवा खाल्यानं कॅन्सर होण्याची जास्त शक्यता आहे.
यासंबंधीचा अभ्यास करताना असं समोर आलयं की पानात असलेली सुपारीमुळे कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. संशोधकांनी असं सांगितलयं की पानात तयार करत असताना वापरलेल्या पदार्थांमुळे कॅन्सर बळावतो.
वैज्ञानिक मू-रोंग च्याओ आणि चिउंग वेन यांनी अशी माहिती दिलीयं, सुपारीप्रमाणे पानातही कॅन्सर होण्याची काही घटक आहेत. त्यामुळे पान खाल्याने कॅन्सर होऊ शकतो.
पानाबद्दलचे संशोधन पूर्ण करण्यासाठी तायवानमधील साइस काऊन्सिलकडून आर्थिक मदत करण्यात आली होती. भारत, चीन, आणि अन्य आशियाई देशात पान अतिशय लोकप्रिय आहे.
First Published: Saturday, October 27, 2012, 17:48