Last Updated: Saturday, September 28, 2013, 20:00
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सौम्य संसर्गजन्य ताप अर्थातच डेंग्यू झाल्यानं बॉलीवूड अभिनेता रणबीर सिंगला शुक्रवारी सकाळी मुंबईमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. केवळ रणबीरच नाही तर मुंबईत अनेक जणांना डेंग्युमुळे हॉस्पीटल गाठावं लागलंय. केवळ डेंग्यूमुळेच नव्हे तर व्हायरल तापानेही प्लेटलेटस् वेगाने कमी होतात.
सौम्य संसर्गजन्य ताप हिवताप, तीव्र डोकेदुखी, तीव्र वेदना ही लक्षणं दिसल्यास जवळच्या डॉक्टरांकडे जा. निष्काळजीपणा करू नका. ते धोकादायक होऊ शकतं.
डेंग्यूपासून बचावसाठी खबरदारीचे उपाय... > पाण्याचे भांडे झाकून ठेवा.
> कुलरमध्ये पाणी साचू देऊ नका. वेळेवर साफसफाई करा.
> डेंग्यूमुळे प्लेटलेटस् झालेली हानी भरून काढण्यासाठीचे उपाय
> वॉश बेसीन, सिंक आदी ज्याठिकाणी साफसफाईची काम चालतात ती ठिकाणं स्वच्छ आणि कोरडी ठेवा
> अनेक दिवस कोणत्याही भांडयात पाणी ठेऊ नका. एका आठवड्यात ते बदला.
> बाल्कनी, छत इत्यादी ठिकाणी पाऊसाचे पाणी गोळा करू नका .
> डास मारण्यासाठी औषधांचा वापर करा.
> डेंग्यू संक्रमित डास ओलसर भागात आणि दिवसा चावत असल्याने अशा भागात जाणे टाळा.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, September 28, 2013, 18:10