शुक्राणुच्या हालचालींची माहितीचे थ्रीडी फिल्मच्या सहाय्याने , scientists take first ever 3D film

शुक्राणुच्या हालचालींची माहितीचे थ्रीडी फिल्मच्या सहाय्याने

शुक्राणुच्या हालचालींची माहितीचे थ्रीडी फिल्मच्या सहाय्याने
www.24taas.com , वॉशिंग्टन, झी मीडिया

शुक्राणुमध्ये असणाऱ्या विसंगती शोधण्यासाठी थ्रीडी फिल्मचे नवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. या नवीन तंत्रज्ञानच्या सहाय्याने शुक्राणुच्या हालचालींच्या माहितीचे थ्रीडी फिल्म बनवून निरिक्षण करता येईल. शुक्राणु प्रजनन क्षमतेचा अनुमान लावणे या तंत्रज्ञानाने शक्य होणार आहे.

संशोधकाच्या दाव्यानुसार हे पहिलेच असे तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे शुक्राणु प्रजनन क्षमतेचा अनुमान थ्रीडी फिल्मच्या मदतीने लावता येईल. तसेच शुक्राणुसंख्या आणि हालचाली यांचे निरिक्षण रेकॉर्ड तयार करण्यासाठी, या तंत्रज्ञानचा उपयोग होईल.

सध्या उपल्बध असणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे केल्या जाणाऱ्या तपासण्यांमध्ये संगणकाआधारे निरीक्षण केले जात आहे. इटली आणि बेल्जियमच्या संशोधकांनी मायक्रोस्कोपी आणि होलॉग्राफी या तंत्रज्ञानाचा संगम घडवून नवीन त्रिमितीय तंत्रज्ञान विकसित केले आहे.

केंब्रिजच्या हॉर्वर्ड विश्वविद्यालयाचे प्रमुख संशोधक ग्यूसेप डी कॅप्रियो यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 13, 2014, 18:32


comments powered by Disqus