आता झोपेत घोरण्याचा नाही जीवाला `घोर` Snoring is not bad

आता झोपेत घोरण्याचा नाही जीवाला `घोर`

आता झोपेत घोरण्याचा नाही जीवाला `घोर`
www.24taas.com, लंडन

झोप ही मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माणसाने निदान दिवसातून आठ तास तरी झोप घेतली पाहिजे. काहीजणांना झोपेत घोरण्याची सवय असते. आपण झोपेत घोरत आहोत हे कुठल्याही माणसाला माहीत नसते. आणि त्याचा काहींना त्रासही होतो. श्वास थांबणे, धाप लागणे इत्यादी. घोरणे हे शरीरासाठी चांगले नसते असे मानले जाते.

एका शोधात असे समोर आले आहे की जे कोणी स्लीप एप्निया(झोपेत श्वास थांबणे) या रोगाने पीडित नाहीत त्यांना घोरण्यामुळे कसाल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. लूलॉक इंस्टीट्यूट ऑफ रिसर्च सायन्स च्या शोधानुसार एप्निया ने मृत्यू संभव आहे पण हे माहित नव्हते की घोरण्यानेही हृदयरोग वाढतात?

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार जी माणसं झोपेत खूप वेळा घोरतात त्यांना पुढल्या १७ वर्षात तरी कसलाही धोका होणार नाही. वैज्ञानिक पत्रिकानुसार ‘स्लीप’ अनुसार एखादा मनुष्य १२ टक्के किंवा यापेक्षाही कमी घोरत असेल तर त्याला हृदयरोग होणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे घोरण्याने हृदयविकारही होत नाही आणि मरण ही येत नाही.

First Published: Saturday, September 29, 2012, 16:23


comments powered by Disqus