सामाजिक संवाद साधा... आरोग्य मिळवा!, social interaction is helpful for elder people

सामाजिक संवाद साधा... आरोग्य मिळवा!

सामाजिक संवाद साधा... आरोग्य मिळवा!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

खुलून आपलं आयुष्य जगण्याचं रहस्य काय असेल बरं...? याचं कोडं काही जणांना आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सुटत नाही... पण, ज्यांना हे कोडं सुटतं ते लोक शेवटपर्यंत आनंदी राहतात... खोटं खोटं नाही अगदी खरं खुरं हास्य आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जास्तीत जास्त सामाजिक संवाद साधणं खूप गरजेचं असल्याचं नुकतंच एका संशोधनात समोर आलीय. ज्येष्ठ नागरिकांच्या तणावमुक्त आरोग्यासाठी ही गोष्ट तर अत्यंत महत्त्वाची ठरते.

दररोज आपल्या कुटुंबीयांशी सुसंवाद आणि विविध सामाजिक संस्थांच्या कार्यात सहभाग घेतल्यास ज्येष्ठांचे आरोग्य चांगलेच सुधारू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. सामाजिक संवादामुळे दुसर्‍या व्यक्तींशी जवळचे संबंध वाढू शकतात, तर कधी दुसर्‍यांची निंदा करूनही तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात, असे पेनेनसिल्व्हानिा विद्यापीठाच्या लिन मार्टिर यांनी सांगितले.

विविध सामाजिक भूमिका आणि शारीरिक कार्ये आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र, नकारात्मक सामाजिक संवाद आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे संशोधकांचं म्हणणं आहे. काही प्रकरणांमध्ये म्हणजेच मधुमेहासारखे आजार झालेल्या व्यक्तींना नेमून दिलेला विशिष्ट आहार घेतल्यामुळे त्यांच्या शारीरिक काम करण्यात आणि त्यांच्या वर्तणुकीत बदल होतात, असे मार्टिर म्हणाल्या. सामाजिक संबंधांच्या प्रभावामुळे धूमपान आणि दारूमुळे झालेल्या मत्यूच्या प्रमाणांच्या तुलनेत यामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होते, असे यापूर्वी झालेल्या संशोधनात आढळले आहे. मात्र अजूनही अनेक प्रश्नांचे उत्तर संशोधकांना मिळालेली नाहीत.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 5, 2014, 07:48


comments powered by Disqus