उत्तम स्वास्थ्यासाठी दररोज या गोष्टी कराच..., some required habits for good health

उत्तम स्वास्थ्यासाठी दररोज या गोष्टी कराच...

उत्तम  स्वास्थ्यासाठी दररोज या गोष्टी कराच...
www.24taas, मुंबई

दिवसभर काम करून थकलेले असता... व्यायामासाठी किंवा शरीराल हलकाफुलका ताण देण्यासाठीही वेळ मिळत नाही... अशा तुमच्याही तक्रारी असतीलच... पण, थोडा विचार करा, स्वत:साठी थोडा वेळ काढा आणि मग बघा, तुम्ही तुमचं दररोजचंच शेड्युल जास्त उत्साहानं करता की नाही. सोबतच या काही सोप्या टीप्स ज्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये या गोष्टींचा समावेश करा आणि स्वस्थ राहा...


 सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्या... नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या नंतर शौचास जावं.

 मलमूत्र, शिंकणे, अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायू व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत. या वेगांना रोकण्याचा प्रयत्न करू नका.

 कमी खाणं हे नेहमी स्वास्थ्यासाठी चांगलं... भूकेपेक्षा एक पोळी कमी खाल्यानं पोट ठिक राहतं.

 धैर्यानं काम केल्यास बुद्धि ठिक राहते. पोट व बुद्धी ठिक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो.

 अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणं किंवा श्रम करणं, जेवताना काळजी करणं, जेवताना बोलणं व जेवल्यावर लगेच पाणी पाल्याने अपचन व अजीर्ण होते.

 भूक असल्यावर न जेवणं, भूक नसल्यावर भोजन करणं, न चावता गिळणे, जेवल्यावर तीन तासाच्या आत परत जेवणं व भूकेपेक्षा अधिक जेवणं प्रकृतिला चांगलं नाही. बघितल्याशिवाय पाणी पिऊ नये. जाणल्याशिवाय मित्रता करू नये, हात धुतल्याशिवाय जेऊ नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्याचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शत्रुता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधि आणि विपत्तिपासून बचाव होऊ शकतो.

 अतिव्यायाम, आति थट्टा विनोद, आति बोलणे, आति परिश्रम, आति जागरण, अति मैथुन, ह्या गोष्टींचा अभ्यास असला तरी अति कारणे योग्य नाही, कारण अति करणे आज ना उद्या कष्ट कारकच ठरते.

 या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व रितीने प्रयोग केल्यास औषधाचे काम करणार नाही. योग्य रितीने व योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचे ही विष होऊ शकते. हिवाळ्यात सकाळी उन घेणं व रात्री थंडीपासून बचाव करणं हितकारी असतं. परंतू उपाशी राहणं व उशीरापर्यंत जागणं नुकसानकारक ठरतं.

 झोपण्यास जाण्याअगोदर लघवी करणं, गोड दूध पिणं, दात घासून चूळ भरणं, हात पाय धुणं, दिवसभर केलेल्या कामावर मनन करून ईश्वराचे ध्यान करत झोपणं. मानसिक आणि शारीरिक स्वास्थासाठी हितकार असतं. जेवताना आणि झोपताना मन एकाग्र असतं. जेवताना सॅलेड म्हणून गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पाने, पालक इत्यादी जे काही उपलब्ध असेल ते बारीक सॅलेड करून खा...

First Published: Tuesday, April 9, 2013, 08:01


comments powered by Disqus