सकारात्मक पद्धतीनं करा प्रत्येक दिवसाची सुरुवात..., start your day with positive attitude

सकारात्मक पद्धतीनं करा प्रत्येक दिवसाची सुरुवात...

सकारात्मक पद्धतीनं करा प्रत्येक दिवसाची सुरुवात...
www.24taas.com, मुंबई

आजच्या धकाधकीच्या जीवनात नेहेमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे अतिशय महत्त्वाचं ठरतं. आता सकारात्म दृष्टीकोन म्हणजे नेमकं काय? तर, सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या विसंगत विचारांना अशा पद्धतीने नियंत्रित करून निवडणे की ज्याद्वारे कोणत्याही व्यक्ती, प्रसंग किंवा परिस्थितीत आपल्याला फक्त जास्तीत जास्त सकारात्मक बाजूच दिसली पाहिजे जेणेकरून आपल्याला कसल्याच प्रकारचे प्रसंग, व्यक्ती ध्येय गाठण्यापासून वंचित करू शकणार नाहीत.

जगात असलेल्या चांगुलपणाच्या शक्तीवर आपला सतत विश्वास हवा आणि ती शक्ती आपल्या प्रत्येकात असते. म्हणजेच आपण स्वतःवरचा विश्वास गमवायला नको. त्यामुळे पहिल्यांदा स्वत:वर विश्वास ठेवा आणि आजचा दिवस हा आपल्या उरलेल्या आयुष्याचा पहिला दिवस. मागचं सगळं विसरून नव्या जोमाने कामाला लागा.

ही काही सूत्रं जी तुम्हाला सकारात्मक दृष्टीकोन कायम राखण्यासाठी मदत करतील

 देव किंवा श्रद्धास्थान : रोज जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा आपल्या आवडत्या देवाचे स्मरण जरूर करा

 प्रबळ ईच्छाशक्ती : ध्येय गाठण्यासाठी प्रबळ ईच्छाशक्ती सतत जागृत ठेवा.

 दृष्टीकोन : नेहेमी सकरात्मकच हवा.

 मेमरी : आपल्या मेमरीला महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय लावा.

 संवादकला: लोकांशी बोलताना नेहेमी तीन वेळा विचार करावा.

 संगीत : रोज सकारात्मक संगीत ऐका.

 ज्ञान : आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी शिकले पाहिजे.

 हास्यविनोद : जीवनात हास्याचे महत्त्व वादातीत आहे. रोज थोडेतरी खळाळून हसले पाहिजे.

 दिवसभराची उजळणी : रात्री झोपायच्या आधी सकाळपासून घडलेल्या घटनांची उजळणी करा.

First Published: Saturday, April 6, 2013, 07:42


comments powered by Disqus