Last Updated: Tuesday, February 11, 2014, 17:42
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन व्हिटॅमिन `ए`च्या कमतरतेमुळे पोट आणि श्वसननाचे विकार होण्याची शक्यता बळावते. योग्य प्रमाणात व्हिटॅमिन `ए`चे सेवन न करणाऱ्या मुलांमध्ये पोट आणि श्वसनाचे आजार होण्याची शक्यता असते. ही गोष्ट, अमेरिकेमध्ये ५-१२ वयोगटातील जवळपास २८०० मुलांवर पडताळल्यानंतर सिद्ध करण्यात आलीय.
`मिशिगन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि मिशिगन यूनिव्हर्सिटी`च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली. प्रयोगात केलेल्या निरिक्षणाद्वारे हे सिद्ध झालंय की, ज्या मुलांच्या आहारात व्हिटॅमिन `ए`चे प्रमाण कमी आहे, त्या मुलांना उलट्या, जुलाब, सर्दी आणि ताप यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागतं.
या संशोधनातील शास्त्रज्ञ डॉ. एडुऑडरे विलमोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत अशा स्वरुपाचं कोणतेही संशोधन झालं नव्हतं. त्यामुळे प्रथमच ५-१२ वयोगटातील जवळपास २८०० मुलांवर व्हिटॅमिन `ए`च्या कमतरतेमुळे होणाऱ्या परिणामांचं संशोधन करण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 11, 2014, 17:42