Last Updated: Tuesday, February 18, 2014, 20:14
www.24taas.com, झी मीडीया, मुंबईतुम्हांला दही आवडते का? तर मग अधिक प्रमाणात तुम्ही दही खा... दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो.
युनिवर्सिटी ऑफ कॅब्रीजच्या नीता फोरौही यांनसी सांगितले की, या संशोधनात असे समोर आले की, दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो. दहीमधील गुणधर्मांमुळे हा धोका २८ टक्क्यांपर्यंत कमी होतो.
या संशोधनासाठी ब्रिटनच्या २५००० पुरूष आणि महिलांचा समावेश करण्यात आला. या संशोधनात ७५३ जणांच्या एका आठवड्याच्या खाण्यामधील पदार्थांची तुलना करण्यात आली. या २५ हजार जणांना पुढील ११ वर्षात टाइप २ डायबेटीजची शक्यता आहे.
संशोधकांना पूर्ण दुग्धजन्य पदार्थांचा आणि डायबेटीजचा संबंध असू शकतो का असा विचार आला. त्यावर त्यांनी संशोधन सुरू केले. संशोधनात असे लक्षात आले की दही आणि पनीर सारख्या दुग्धजन्य पदार्थ खाणाऱ्यांमध्ये ११ वर्षात टाइप २ डायबेटीजचा धोका २४ टक्क्यांनी कमी होतो. दुग्धजन्य पदार्थांतून प्रोबायोटिक बॅक्टेरिया आणि आंबविण्याच्या प्रक्रियेमुळे त्यात एक व्हिटॅमिन तयार होते. ते खूप लाभदायक असते. सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात दही खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दही खाल्याने मधुमेह म्हणजे डायबिटीजचा धोका कमी होऊ शकतो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 18, 2014, 20:14