इंग्लंड बॅकफूटवर, इंग्लंडला दुसरा धक्का, Live: India vs England, 5th ODI

इंग्लंड बॅकफूटवर, इंग्लंडला दुसरा धक्का

इंग्लंड बॅकफूटवर, इंग्लंडला दुसरा धक्का
www.24taas.com, धर्मशाळा

धर्मशाळा वन-डेमध्ये टीम इंडियानं ठेवलेल्या 227 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना इंग्लंडची सुरुवात धडाक्यात झाली. कॅप्टन ऍलिस्टर कूक आणि इय़ान बेलनं इंग्लंडला 53 रन्सची दमदार ओपनिंग करून दिली. ही जोडी धोकादायक ठरत असतांना ईशांत शर्मानं कूकला 22 रन्सवर क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर केविन पीटरसनही फारशी कमाल करू शकला नाही. त्याला 6 रन्सवर रवींद्र जाडेजानं आऊट केलं. पाच मॅचेसची वन-डे सीरिज 4-1 नं जिंकण्यासाठी आता टीम इंडियाच्या बॉलर्सना भेदक मारा करावा लागणार आहे.

धर्मशाळा वन-डेमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळली आहे. इंग्लिश टीमच्या तेज मा-यासमोर टीम इंडियाच्या बॅट्समनचं काहीच चालल नाही. गौतम गंभीर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि युवराज सिंग हे भारताचे आघाडीचे बॅट्समन 50 रन्सच्या आतमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतले होते.

त्यानंतर कॅप्टन महेंद्रसिगं धोनी 15 रन्सवर आऊट झाला. टीम इंडियानं वन-डे सीरिज आधीच जिंकली आहे. ही वन-डे जिंकत 4-1 नं सीरिज खिशात घालण्याची धोनी अँड कंपनीला नामी संधी आहे. धोनी आऊट झाल्यानंतर रैना आणि जडेजा यांनी बऱ्यापैक डाव सावरला. रैनाने पुन्हा एकदा संयमी खेळी करीत आपलं अर्धशतक साजरं केलं...

मात्र, भारतीय टॉप बॅट्समननी सपशेल निराशा केली आहे. आता मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी टीम इंडियाला चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत.

First Published: Sunday, January 27, 2013, 12:13


comments powered by Disqus