ईशांतला खुन्नस पडली महागात, Ishant Sharma fined 15% of his match fee while Kamran Akmal fined 5%

ईशांतला खुन्नस पडली महागात

ईशांतला खुन्नस पडली महागात
www.24taas.com, बंगळुरू

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या बंगळरूमध्ये झालेल्या टी-20 मॅचमधील वादावादी ईशांत शर्मा आणि कामरन अकमल यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. आयसीसीनं दोघांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ईशांतच्या मॅच फीमधून १५ टक्के तर कामरानच्या मॅच फीमधून ५ टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. पाकिस्तानची बॅटिंग सुरू असताना १९ व्या ओव्हरमध्ये कामरन आणि ईशांत शर्मा यांच्यात वाद झाला होता.

भारत पाकिस्तान मॅच म्हणजे युद्धच. दोन्ही देशातीलच नाही तर जगभारतील कोट्यावधी चाहत्यांचं लक्ष या मॅचकडे लागलेलं असतं कारण या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांच्या मॅचमध्ये क्रिकेट बरोबरच अशी चुरस पाहायला मिळते जी दुस-या तिस-या कोणत्याही मॅचमध्ये दिसत नाही. पाच वर्षांनतंर भारताच्या दौ-यावर आल्या नंतर या पहिल्याच मॅचमध्ये तीच टशन पुन्हा दिसली. कामरान अकमल आणि ईशांत शर्मा यांच्यात चांगलीच जुंपली.

भारत पाक मॅचम्हणजे मैदानात वाद होणार हे आता जवळजवळ निश्चित. बंगळुरुला झालेली टी-२० लढत आणि अपवाद ठरली नाही. नेहमी प्रमाणेच यावेळीही भारत-पाक मॅचमध्ये खडाजंगी झाली. यावेळी टीम इंडियाची बॉलर ईशांत शर्मा आणि पाकिस्तानी बॅट्समन कामरान अकमल एकमेकांसमोर उभे ठाकले आणि त्यांच्यात चांगलीच जुंपली. त्यांना शांत करण्यासाठी संपूर्ण टीम इंडिया पुढे सरसावली आणि अंपायरलाही मध्यस्ती करावी लागली.

First Published: Thursday, December 27, 2012, 10:50


comments powered by Disqus