Last Updated: Tuesday, December 25, 2012, 22:55
www.24taas.com, बंगळुरूमोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे पाकिस्तानने भारतावर पहिल्या सामन्यात विजय मिळवला. विजयासाठी 3 चेंडुंमध्ये 6 धावांची गरज असताना मलिकने रविंद्र जडेजाला षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले. मलिकने 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 57 धावा काढल्या.
फलंदाजांचे अपयश भारतासाठी पुन्हाच पराभवासाठी कारणीभूत ठरले. गंभीर-रहाणे जोडीने 77 धावांची सलामी दिली. त्यानंतर सर्व फलंदाज धावा काढू शकले नाही.
हाफिजने स्थिरावल्या नंतर दमदार फटकेबाजी करुन अर्धशतक झळकावलं. हाफिजला इशांत शर्माने 61 धावांवर बाद केले. तर अशोक डिंडाने पुढच्याच षटकात कामरान अकमलला बाद केले. अकमलने केवळ 1 धाव काढली.
भारत- पाकिस्तानमध्ये होत असलेल्या पहिल्या सामन्यात आज भारताने पाकिस्तानच्या टीमसमोर १३४ धावांचं आव्हान उभं केलं होतं. ७७ धावांवर भारताची पहिली विकेट गेल्यावर पुढील इनिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. जेमतेम ११५ धावांमध्ये निम्मा संघ तंबूत परतला होता.
First Published: Tuesday, December 25, 2012, 20:49