पाकिस्तानच्या विजयावर भारताचा जावई म्हणतो..., pakistan win, shoiab says...

पाकिस्तानच्या विजयावर भारताचा जावई म्हणतो...

पाकिस्तानच्या विजयावर भारताचा जावई म्हणतो...
www.24taas.com, बंगळुरू

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा पती आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक मंगळवारी झालेल्या मॅचचा हिरो ठरला. शोएब आणि हाफिजच्या खेळीमुळे पाकिस्तानला पहिल्यांदाच टी २० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतावर विजय प्राप्त करणं शक्य झालं.

यावेळी, या विजयामुळे तुमच्या परिवारातील कोणी निराश झालंय का? असा मिश्किल प्रश्न पत्रकारांनी सानियाचं नाव न घेता शोएबला विचारला. यावर शोएबनंही ताडकन उत्तर दिलं, ‘मी चांगले रन बनविले होते त्यामुळे नक्कीच सगळे खुश झाले असतील’. विजयाबद्दल बोलताना शोएब म्हणतो, भारताच्या नवख्या बॉलर्सनं सुरुवातीला पाकिस्तानला चांगलेच धक्के दिले होते. पण त्यानंतर मात्र हाफीजनं डाव सांभाळला’

भारताशी खेळताना नेहमी दबाव जाणवत राहतो पण परिस्थितीला अनुसरून खेळणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं शोएबनं म्हटलंय.

First Published: Wednesday, December 26, 2012, 13:46


comments powered by Disqus