सचिन... तुझी खुप आठवण येतेय पण तुझ्या गाण्यांची नाही, Team India says will miss Sachin, but not his music

सचिन... तुझी आठवण येतेय पण तुझ्या गाण्यांची नाही

सचिन... तुझी आठवण येतेय पण तुझ्या गाण्यांची नाही
www.24taas.com, बंगळुरू
सचिननं ‘वनडे’मधून निवृत्ती जाहीर केली त्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यांना वाईट वाटलं. तितकंच वाईट वाटलं होतं टीम इंडियाच्या शिलेदारांनाही... पण, सध्या मसुरीला असलेल्या सचिनला चिअरअप करण्यासाठी टीम इंडियानं भारत-पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये त्याला हसवण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काही स्पेशल पोस्टर्स झळकावले.

‘मास्टर ब्लास्टर वुई लव्ह यू अॅन्ड मिस यू... बट् फायनली वुई कॅन लिसन टू अवर ओन म्युझिक इन द ड्रेसिंग रुम’ असा संदेश लिहिलेलं पोस्टर भारत पाकिस्तानच्या टी-२० सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमच्या बाहेर लावलेलं दिसलं. सचिनवर असलेलं प्रेम आणि त्याच्या जाण्याचं दु:ख यातून दिसून येत होतं. पण थोड्या विनोदवृत्तीचा वापर करत टीम इंडियाच्या नव्या शिलेदारांनी आपला दुसरा मॅसेजही सचिनपर्यंत पोहचवला.

सचिनला जुनी गाणी ऐकायला खूप आवडतात. त्यातही किशोर कुमार हा त्याचा आवडता गायक... मग काय, सचिन ड्रेसिंग रुममध्ये असल्यावर सगळ्यांनाच ही गाणी ऐकायला लागायची... पण, आता मात्र टीम इंडियाचे नव्या शिलेदारांना आपल्या मनसपसंतीची हिप-हॉप गाणीही ऐकायला मिळणार आहेत, हाच संदेश त्यांनी मास्टर ब्लास्टरपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलाय. नेहमी हसत राहणाऱ्या सचिनची आपल्या साथीदारांच्या या संदेशामुळं कळी खुलली असेल, यात शंकाच नाही.

First Published: Thursday, December 27, 2012, 15:17


comments powered by Disqus