टीम इंडिया जोरदार कमबॅक करेल - सचिन, Team India will come back: Sachin Tendulkar

टीम इंडिया जोरदार कमबॅक करेल - सचिन

टीम इंडिया जोरदार कमबॅक करेल - सचिन
www.24taas.com,मसुरी

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज प्रथमच मीडियासमोर आला. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध जोरदार कमबॅक करेल, असा विश्वासही त्यांने व्यक्त केलाय.

वनडे क्रिकेटला नुकताच अलविदा केलेला मास्टर ब्लास्टर आपल्या रिटायरमेंट नंतर पहिल्यांदाच मिडिया समोर आला. आपल्या २३वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात चाहत्यांनी दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी त्यानं चाहत्यांचे आभार मानलेत.

टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध जोरदार कमबॅक करेल, असा विश्वास व्यक्त केला. आता परिवारासोबत चांगला वेळ घालवत असून टीममधून जरी बाहेर असलो तरी मनाने टीम जवळ असल्याचंही त्यानं मोकळे पणानं मान्य केलं.

टीम इंडियाला माझ्या शुभेच्छा आहेत. भारतीय संघाला सध्या शुभेच्छांची गरज आहे. मला आशा आहे, की कोलकतामध्ये भारतीय संघ कमबॅक करेल, असे सचिनने म्हटलंय.

First Published: Wednesday, January 2, 2013, 13:44


comments powered by Disqus