Last Updated: Saturday, December 15, 2012, 20:04
www.24taas.com, नवी दिल्ली आता लवकरच आपल्याला प्लास्टिकच्या पण खऱ्याखुऱ्या नोटा पाहायला मिळणार आहेत. अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी राज्यसभेत ही घोषणा केलीय.
बनावट नोटांच्या वापरास आळा घालण्यासाठी नव्हे तर नोटा दीर्घकाळ वापरता याव्यात यासाठी पॉलिमर / प्लास्टिकच्या नोटा वापरात आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय. सुरुवातीला १० रुपयांच्या एक अब्ज पॉलिमर नोटा छापून पाच शहरांमध्ये चाचणी घेण्यासाठी प्रोयोगिक तत्त्वावर वितरण करण्यात येतील.
नोटांचं आयुष्य कसं वाढवता येईल या प्रश्नावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी सल्लामसलत करून अनेक पर्यायांवर विचार सध्या सुरू आहे, असंही पी. चिदंबरम यांनी सांगितलंय.
त्याचप्रमाणे बनावट नोटा हाही भारतासाठी कळीचा प्रश्न ठरलाय. सीमेपलिकडून होणारा बनावट नोटांचा पुरवठा कसा थांबवता येऊ शकतो, याबद्दलही उपाययोजना लागू करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी बांग्लादेश आणि नेपाळकडून भारताला सहकार्य मिळत असल्याचंही अर्थमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय.
First Published: Saturday, December 15, 2012, 20:04