Last Updated: Tuesday, February 25, 2014, 23:25
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीभाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेसच्या यूपीएला पराभूत करण्यासाठी परस्पर सहकार्यानं आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय 11 पक्षांनी घेतलाय.
आज दिल्लीत या पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर या पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
काँग्रेस आणि भाजपची धोरणं सारखीच असल्यामुळे या दोघांना तिसरा पर्याय देणं आवश्यक असल्याचं माकपचे नेते प्रकाश करात यांनी यावेळी सांगितलं.
तिस-या आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, या प्रश्नावर मात्र निकालानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असंच या नेत्यांनी सांगितलं.
या बैठकीला जयललिता, मुलायम सिंग यादव, नीतीश कुमार, शरद यादव, तसंच डाव्या पक्षाचे नेते उपस्थित होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 25, 2014, 23:00