Last Updated: Thursday, June 13, 2013, 13:58
www.24taas.com, झी मीडिया, कोच्चीधक्कादायक! देशात महिलांवर अत्याचारात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई आणि दिल्लीत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत संताप व्यक्त होत आहे. मात्र, एक धाक्कादायकबाब उघड झालेय. कोच्चीत एका ४० वर्षीय महिलेने ११ वर्षांच्या मुलाचे यौन शोषण केल्याचे पुढे आलेय.
यौन शोषण करणारी ही महिला त्या मुलाच्या शेजारी राहणारी आहे. ११ वर्षांचा मुलगा हा शोलय विद्यार्थ्यी आहे. या मुलाने लाजेपोटी कोणाला ही बाब सांगितली नाही. यौन शोषण करणारी महिला एर्नाकुलम जिल्ह्यातील पारूर या परिसरात राहते. ही बाब पुढे आल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला असून मुलाचे शोषण करणाऱ्या या महिला पोलिसांनी अटक केलीय.
पिडीत मुलासोबत या महिलेने ११ डिसेंबरपासून अत्याचार करण्यास सुरूवात केली. ही बाब मुलाने आपल्या वर्ग मित्राला सांगितली. त्यानंतर हि माहिती त्या मुलाच्या मार्फत पिडीत मुलाच्या घरी समजली. त्या मुलाच्या घरच्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंद होताच त्या महिलेला तात्काळ पोलिसांनी अटक केली.
अल्पवयीन मुलाचा जबाब पोलिसांनी नोंदविलाय. अत्याचार करणाऱ्या महिलेविरोधात लैंगिग शोषण कायद्याखाली या गुन्हाची नोंद करण्यात आलेय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 13, 2013, 13:58