Last Updated: Tuesday, October 23, 2012, 10:28
www.24taas.com, मेरठ उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सिवाया गावातील सावत्र बापाने आपल्याच १२ वर्षाचा मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्कारं आणि खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर आरोपी सध्या फरार आहे.
सिवाया गावातं आरोपी आणि त्या दुसरी पत्नी आणि १२ वर्षाची सावत्र मुलगी यांच्यासोबत राहत होता. आरोपीची पत्नी कामवरून परतल्यानंतर तिने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर तिची मुलगी तिला अर्धनग्न अवस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह जमिनीवरच होता. पत्नी आपल्या पतीविरोधात बलात्कार आणि खुनाचा आरोप लावला आहे.
आरोपीच्या पत्नीचं पहिलं लग्न मध्यप्रदेश मध्ये झालं होतं. पती दारूच्या आहारी गेल्याने आणि सतत होणारी मारहाण याला कंटाळून तिने सहा वर्षापूर्वीच आपल्या पहिल्या नवऱ्याचं घर सोडून, प्रेम विवाह केला. सहा महिन्यापूर्वीच आरोपी आणि त्याची पत्नी मुलगी हे मेरठमध्ये आले होते.
First Published: Tuesday, October 23, 2012, 10:16