येडियुरप्पांमुळे कर्नाटक सरकार धोक्यात 13 BJP MLAs back BSY, K`taka govt faces threat

येडियुरप्पांमुळे कर्नाटक सरकार धोक्यात

येडियुरप्पांमुळे कर्नाटक सरकार धोक्यात
www.24taas.com, बंगळुरू

बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटक जनता पार्टी हा नवा पक्ष स्थापन केल्यानं कर्नाटकमधील भाजप सरकारच्या स्थैर्याला धोका पोचलाय. भाजपचे तेरा आमदार उघडपणे येदियुरप्पा यांच्याबरोबर गेलेत.

या आमदारांनी पक्षाने दिलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या इशा-याकडे दुर्लक्ष करत येदियुरप्पांच्या रॅलीत सहभाग घेतला. इतकंच नव्हे तर हे तेरा आमदार येदियुरप्पांबरोबर व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी केलाय.

कर्नाटक विधानसभा विसर्जित करून भाजपनं पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं, असं आव्हान माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी दिलंय.

First Published: Sunday, December 9, 2012, 21:34


comments powered by Disqus