कंपनीची उलाढाल १३ हजार कोटींची, पगार केवळ , 13 thousand crore company tonnes over, pay only 1 Rupee

कंपनीची उलाढाल १३ हजार कोटींची, पगार केवळ १ रूपया

कंपनीची उलाढाल १३ हजार कोटींची, पगार केवळ १ रूपया
www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली

कंपनीची उलाढाल १३ हजार कोटी रूपयांची. मात्र, एवढी मोठी उलाढाल असलेल्या या कंपनीचे सहसंस्थापक केवळ १ रूपयाच वेतन घेत आहे. तुम्हीही हैराण झालात ना. कोण आहे ती व्यक्ती? व्यक्ती आहे जगातील अग्रस्थानी असलेल्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी इन्फोसिसचे सहसंस्थापकनारायण मूर्ती.

जगातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये इन्फोसिसचे स्थान अग्रक्रमावर आहे. या कंपनीची उलाढाल १३ हजार कोटी रपये असताना कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती मात्र एक रुपयाचे नाममात्र वेतन घेत आहेत. ते सुद्धा केवळ एक रूपया. काही वर्षांपूर्वी संगणक जगाचा बादशहा बिल गेटस् भारतात आले होते. त्यावेळी त्याने नारायणमूर्तींची कौतुक केले होते.

नारायण मूर्ती ही व्यक्तीच भारताची मोठी संपत्ती आहे, असे गौरव उद्गार बिल गेटस् यांनी काढले होते. तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी त्यांनी इन्फोसिसमधून निवृत्ती घेतली खरी. परंतु त्यांच्या निवृत्तीनंतर कंपनीचे स्थान घसरले. यावर मात कऱण्यासाठी मूर्ती यांनी कंपनीत पुनर्प्रवेश केला. त्यांच्या आगमनानंतर कंपनीला निव्वळ नफा २८७५ कोटी रूपयांवर गेला.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 14, 2014, 12:13


comments powered by Disqus