१३ वर्षीय मेहुणीसोबत लग्नास नकार, जावयाची सासूला धमकी, 13 year old marriage refused

१३ वर्षीय मेहुणीसोबत लग्नास नकार, जावयाची सासूला धमकी

१३ वर्षीय मेहुणीसोबत लग्नास नकार, जावयाची सासूला धमकी
www.24taas.com, झी मीडिया,अंबाला

१३ वर्षीय मेहुणीसोबत लग्नास नकार दिल्याने चक्क जावयाने सासूला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्या महिलेने पोलीस चौकीत आपल्या जावयाविरूद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.

जावयाचा आपल्या मेहुणीवर डोळा होता. सासूवर लग्नासाठी दबाब आणत त्यांने मुलगी अर्थात पत्नीला त्रासही देण्यास सुरूवात केली होती. सासूची १३ वर्षीय लहान मुलीसोबत तो जबरदस्तीने लग्न करण्यासाठी प्रयत्न करीत होता. अंबला गावातील या महिलेला तो जावई धमकी देत होता.

'जर माझे लग्न तिच्यासोबत करून दिले नाही तर मी त्या मुलीला मारून टाकेन. या गोष्टीवरून पीडित महिलेच्या मोठ्या मुलीलाही टॉर्चर करत आहे' अशी तक्रार आईनं केलीय. या गरीब कुटुंबाच्या तक्रारीकडे अंबाला शहरातील पोलिसांनी लक्ष दिले नाही. मीडियाने ही घटना उघड केल्याने पोलिसांनी या गोष्टीचा तपास करण्यास सुरूवात केली.

अंबाला शहरात राहणाऱ्या महिलेने पोलिसांना सांगितले, आपल्याला जावई मारून टाकण्याची धमकी देत आहे. त्या महिलेच्या मोठ्या मुलीसोबत त्याचे लग्न झाले आहे. या मुलीच्या लग्नावेळी तिच्या लहान मुलीचे वय १ वर्ष होते. लग्नानंतर काही वर्ष सर्व ठीक चालू होते. पण आता तो जावई या महिलेकडे अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्याची आगळीवेगळी मागणी करत आहे. त्या जावयाने महिलेला अशी धमकी दिली आहे. मी त्या मुलीला घेऊन जाईन आणि त्याला कोणीही काहीही करू शकणार नाही.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 30, 2013, 15:39


comments powered by Disqus