Last Updated: Thursday, October 25, 2012, 16:51
www.24taas.com, तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरमच्या एसएटी हॉस्पीटलमध्ये एक धक्कादायक घटना उघड झालीय. एका अवघ्या १३ वर्षांच्या मुलीनं एका बाळाला जन्म दिलाय.
या अल्पवयीन मुलीला २० सप्टेंबर रोजी हॉस्पीटलमध्ये चिंताजनक अवस्थेमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. गेल्या सोमवारी या मुलीनं एका बाळाला जन्म दिलाय. या अल्पवयीन मुलीबरोबर शारीरिक संबंध नेमके कुणी प्रस्थापित केले होते, हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हॉस्पीटलच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण, या मुलीच्या आई-वडिलांनी मात्र पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला.
कोल्लम जिल्ह्यातील कोट्टारक्कारामध्ये राहणारी शाळेत जाणारी ही मुलगी इयत्ता आठवीत शिकत आहे.
First Published: Thursday, October 25, 2012, 16:51