Last Updated: Wednesday, May 22, 2013, 16:01
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन पोलिस आपापसात भिडल्याची खळबळजनक दृश्य थेट कॅमेऱ्यावर चित्रित झाली आहेत.
कार्यक्रम स्थळाच्या बाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचा-यांनी एकमेकांना काठीने जबरदस्त मारहाण केली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नसल्याची टीका विरोधकांकडून कायम केली जाते.
अशा प्रकारे जर पोलिसच आपापसात भिडणार असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहणार तरी कसं असा सवाल उपस्थित होतो....
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा. *
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, May 22, 2013, 15:57