Last Updated: Sunday, April 28, 2013, 13:55
www.24taas.com,झी मीडिया,बेळगावबेळगावमध्ये कॉलेज तरूणीवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलीये. दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच बेळगावमधील सुलेभावी गावात एका २० वर्षीय कॉलेज तरूणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली.
धक्कादायक बाबम्हणजे हत्येनंतर या तरुणीच्या शरीरावर `मराठा` असे लिहून तिचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह गावातील एका शेतात फेकून देण्यात आला होता. अत्यंत क्रुरपणे तरुणीवर अत्याचार केला. खून केल्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून दगडाने तिचा चेहरा ठेचून विद्रुप करण्यात आला.
ही कॉलेज तरूणीवर सरकारी डिग्री कॉलेजमध्ये शिकत होती. शुक्रवारी बेळगाव येथून परीक्षा देऊन घरी येत असताना अज्ञात लोकांनी तिचे अपहरण केले होते. मृत मुलीच्या वडिलांनी कपडे आणि चपलांवरुन मृतदेहाची ओळख पटवली आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुलीच्या घरचे ती घरी न आल्याने अस्वस्थ होते. मात्र संपूर्ण रात्रभर ती घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर शनिवारी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
कॉलेज तरूणीवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आल्याने सर्वांनाच हादरा बसलाय. पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी लगेचच या घटनेला जबाबदार असणा-या आरोपींना पकडण्यासाठी तीन टीम तयार केल्या आहेत. दरम्यान, गेल्या तीन महिन्यातील सामूहिक बलात्काराची ही दुसरी घटना आहे. तर सामूहिक बलात्कारातील आरोपी अजूनही मोकाट आहेत.
First Published: Sunday, April 28, 2013, 13:55