Last Updated: Tuesday, May 21, 2013, 23:07
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराजीव गांधी...भारताचे माजी पंतप्रधान...या द्रष्ट्या नेत्याची आज 22 वी पुण्यतिथी....मतदानाचं वय 21 व्या वर्षावरुन 18 वर आणणा-या राजीव गांधीचं भारताच्या जडणघडणीतलं योगदान असामान्य....राजीव गांधींना झी मीडियाचा सॅल्यूट...
माहिती आणि तंत्रज्ञानात भारताला पुढे घेऊन जाऊ पाहणा-या या द्रष्ट्या नेत्याला हे कुठे ठाऊक होतं, की 21 व्या शतकात भारतातील जनतेच्या हातात मोबाईल असेल. अर्ध्या अधिक जनतेकडे इंटरनेट कनेक्शन असेल...बँकिंगचे व्यवहार हे संगणकाच्या माध्यमातून होत असतील. रेल्वे बुकिंगही घरबसल्या होईल. आणि यामुळे एकप्रकारची शैक्षणिक क्रांतीही होईल. राजीव गांधींचं ना जी-मेल अकाऊंट होतं...ना ऑर्कुट..ना फेसबूक अकाऊंट....व्हॉट्सएप तर त्यांनी कधी पाहिलंही नाही. त्यांनी पाहिला होता फक्त तरुणाईचा भारत.
आज याच भारत देशाने तंत्रज्ञानाला कवेत घेतलंय...मोबाईल..इंटरनेटच्या माध्यमातून जग आता हातावर दिसू लागलंय. राजीव गांधींच्या द्रष्ट्या नजरेनं हेच तर स्वप्न पाहिलं होतं. राजीव गांधींना झी मीडियाचा सलाम.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 21, 2013, 23:07