भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!, 26 January, republic day at new delhi

भारताचा ६४ वा प्रजासत्ताक दिन!

भारताचा ६४ वा प्रजासत्ताक दिन!
<> www.24taas.com, नवी दिल्ली

आज आपल्या भारत देशाचा ६४ वा प्रजासत्ताक दिन... राजधानी दिल्लीत इंडिया गेट परिसरात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, संरक्षण मंत्री ए. के. अॅन्टोनी राजपथावर उपस्थित होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.


प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर भारतीय ताकदीचं दर्शन घडवण्यात आलं. राष्ट्रपती आणि प्रमुख अतिथींना सलामी दिल्यानंतर शौर्य आणि संस्कृतीचं दर्शन राजपथावर घडवण्यात आलं. पृथ्वी, अग्नि-५, ब्रम्होस अशा क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून भारताच्या शक्तीचं प्रदर्शन करण्यात आलं तर दुसरीकडे विविध राज्यांच्या चित्ररथांच्या माध्यमातून संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं. यावेळी विविध राज्यांनी आपापल्या चित्ररथातून संस्कृतीचं राजपथावर सादरीकरण केलं.

सकाळी ९.०० वाजता या सोहळ्याला सुरूवात झाली. प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावून कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर राजपथावर भव्य अशी परेड पार पडली. या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक उपस्थित होते. भारतातील वेगवेगळ्या राज्यांची ओळख दाखवणारे चित्ररथ मोठ्या डौलात राजपथावर दाखल झाले होते.

१९५० साली आजच्याच दिवशी देशाचं संविधान लागू करण्यात आलं होतं आणि याच दिवशी ट ‘गणराज्य’ भारताची घोषणा करण्यात आली होती.

First Published: Saturday, January 26, 2013, 09:56


comments powered by Disqus