Last Updated: Monday, January 21, 2013, 15:13
www.24taas.com,नवी दिल्लीदेशात महिलांवरील अत्याचार थांबायला तयार नाहीत. पंजाबमधील मोंगा जिल्ह्यात एका २६ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराचं प्रकरण समोर आलंय.
चार नराधमांनी तरूणीवर चालत्या कारमध्य़े बलात्कार करून तरूणीला रस्त्यावर फेकून दिलं. या तरूणीवर सलग दोन दिवस बलात्कार करण्यात आल्याचं उघड झालंय.
पीडित तरूणी बस स्टँडवर बसची वाट पाहत उभी होती. त्यावेळी पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं आलेल्या व्यक्तीनं तिला कारमध्ये जबरदस्तीनं बसवलं. तिला गुंगीचं इंजेक्शन देऊन एका खोलीत नेलं. या चौघा नरधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर या तरूणीनं आरडाओरडा केला. मात्र पोलखोल व्हयला नको म्हणून तिला पुन्हा गुंगीचं इंजेक्शन देण्यात आलं. हा प्रकार सतत दोन दिवस सुरू होता. अखेर रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता भटिंडा डबवाली रोडवर तरुणीला चालत्या कारमधून फेकून देण्यात आलं.
तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची परिस्थिती गंभीर आहे. चौघा आरोपींनी अश्लिल व्हिडिओ बनवण्याचा दावाही पीडित तरुणीनं केलाय. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असून पोलीस आरोपींचा शोध घेतायेत.
First Published: Monday, January 21, 2013, 12:16