26/11 : NSG कमांडोंकडे सरकारचं दुर्लक्ष, NSG commandos living in pitiable condition`

26/11 : NSG कमांडोंकडे सरकारचं दुर्लक्ष

26/11 : NSG कमांडोंकडे सरकारचं दुर्लक्ष
www.24taas.com,नवी दिल्ली

26/11हल्ल्यातील NSG शूर कमांडोंकडे सरकारचे दुर्लक्ष केले आहे. कमांडोंना वेळेवर पेन्शन मिळत नाही, माहितीच्या अधिकारात झाले उघड झाले आहे. जखमी NSG कमांडोंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप NSG कमांडो सुरेंद्र सिंग यांनी केला आहे.

इंडिया अगेन्स करप्शनच्या अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक गौप्यस्फोट केलाय. 26/11च्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात लढलेल्या एनएसजी कमांडोंकडे सरकारनं अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय.

पत्रकार परिषदेत एनएसजी कमांडो सुरेंद्र सिंग यांनी आपली व्यथा मांडली. NSG कमांडोंना त्यांचे हक्क मिळालेले नाहीत. तर जखमी NSG कमांडोंना सकरकारने मदत केलेली नाही दहशतवाद्यांविरोधात लढतांना जखमी झालेल्या जवावानांना साधी वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात आली नाही, असा खळबळजनक आरोप सुरेंद्र सिंग यांनी केलाय. त्यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळवल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

First Published: Thursday, November 22, 2012, 14:02


comments powered by Disqus