Last Updated: Friday, August 24, 2012, 10:21
www.24taas.com,नवी दिल्लीसुप्रीम कोर्टात आज केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदबरम यांच्या टू जी घोटाळ्यातील भूमिकेबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
पी चिदंबरम यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोर्ट या याचिकेच्या ग्राह्यतेवर निर्णय देणार आहे. टू जी घोटाळ्याच्या काळात पी. चिदंबरम अर्थमंत्री होते त्यामुळे चिदंबरम यांची नेमकी भूमिका काय होती याचा तपास करण्यात यावा या मागणीसाठी यापूर्वी सीबीआय कोर्टात अर्ज केला होता.
मात्र सीबीआय कोर्टानं तो फेटाळला. त्यामुळे त्याला आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीये. आता सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय घेतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.
First Published: Friday, August 24, 2012, 10:21