Last Updated: Friday, May 23, 2014, 23:18
www.24taas.com, झी मीडिया, आग्राएखाद्या चित्रपटातील दृश्य असावं, अशा फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी आग्रामधील विजया बँक लुटली आहे. चोरट्यांनी 15 मिनिटांत 30 लाख रूपये लूटले आणि 11 लोकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या बँकेपासून 15 मीटर अंतरावर पोलिस स्टेशन आहे.
चोरट्यांनी फक्त बँक लूटली नाही तर शेवटी ग्राहक आणि बँक स्टाफसह 11 लोकांना स्ट्राँग रूममध्ये कोंबलं आणि पेट्रोल टाकून आग लावली. यानंतर बँकेच्या दाराला कुलूप ठोकून चोरट्यांनी धूम ठोकली.
बँकेतून येत असलेला धूर पाहून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांनी जीव धोक्यात टाकून अडकलेल्या 11 ग्राहकांना बाहेर काढलं, यातील दोन जणांची स्थिती अजूनही गंभीर आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 23, 2014, 23:18