Last Updated: Saturday, October 19, 2013, 21:46
www.24taas.com, वृत्तसंस्था, आझमगड विषारी दारू प्यायल्यामुळे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर परिसरात घडली आहे.
या लोकांनी विषारी दारू शुक्रवारी पिलेली असून, आज सकाळी पंधरा जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आणखी काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी कर्तव्यात कसूक केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश सरकारने पोलिस दलातील सहा आणि उत्पादन शुल्क विभागातील पाच, अशा ११ जणांना निलंबित केले आहे.
मुबारकपूर परिसरातील आठ गावांतील काहींनी गावठी दारू प्राशन केली होती. नंतर ते आजारी पडल्याची माहिती पोलिस अधीक्षक अरविंद सेन यांनी दिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, October 19, 2013, 21:46