Last Updated: Tuesday, April 23, 2013, 15:33
www.24taas.com, भोपाळएका नराधमाच्या अमानूष अत्याचाराला बळी पडलेल्या मध्य प्रदेशच्या सिवनीतल्या ४ वर्षीय चिमुरडीची प्रकृती आणखी नाजूक बनलीय... तिच्या प्रकृतीत अजून काहीही सुधारणा झाली नसून तिला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलंय... चिमुरडी अजूनही व्हेंटिलेटरवर आहे...
मेंदूला दुखापत झाल्यानं ती अजूनही कोमात आहे... लहानगीला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचं तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितलंय.. सिवनी जिल्ह्यातील घनसौर गावातील रहिवासी असलेल्या या चिमुरडीला शनिवारी नागपूरच्या खाजगी रुग्णालयात भरती केले होते.
दिल्ली आणि मध्यप्रदेशात चिमुरडींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं सारा देश हादरला... या घटनेनंतर गुडियावर दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.. तिची प्रकृती आता स्थिर आहे.. तिला आणखी 2 आठवडे हॉस्पिटलमध्ये राहावं लागण्याची शक्यता आहे.. तर मध्य प्रदेशातल्या सिवनीतील बलात्कार पीडित 4 वर्षीय चिमुकलीची प्रकृती नाजूक आहे..
First Published: Tuesday, April 23, 2013, 15:33