दहशतवादी हल्ल्यासाठी ४० तरुण सज्ज?, 40 young terrorists ready to attack?

दहशतवादी हल्ल्यासाठी ४० तरुण सज्ज?

दहशतवादी हल्ल्यासाठी ४० तरुण सज्ज?
www.24taas.comनवी दिल्ली

महाराष्ट्रात पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

इंडियन मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय असलेले महाराष्ट्रातील ४० तरुण गेल्या कित्येक महिन्यांपासून बेपत्ता आहेत. ते एकतर पाकिस्तानात गेलेत. तर काही जण लपून बसले आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

देशात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत ४० तरूण असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक , उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांमधील काही तरुणही इंडियन मुजाहिदिनमध्ये गेल्याचा तसेच बेपत्ता झाल्याचा संशय आहे . मात्र त्याबाबतची तपशीलवार माहिती हाती आलेली नाही.

या तरुणांना कट्टरतावादी बनवून ‌ इंडियन मुजाहिदिनकडे वळवण्यात आलेय. त्यापैकी काही जण दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेल्याचा तर काही जण देशातच लपून बसल्याचा संशय आहे, अशी माहिती देण्यात समोर आली आहे. त्यामुळे देशात कुठेही दहशतवादी ह्ल्ल्याची शक्यता आहे.

First Published: Wednesday, September 12, 2012, 08:19


comments powered by Disqus