Last Updated: Tuesday, February 12, 2013, 15:42
www.24taas.com, नवी दिल्लीवेश्यागमन हा प्रकार बेकायदेशीर असूनही देशभरात अनेक ठिकाणी रात्री राजरोसपणे वेश्यांकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचं कारण म्हणजे कायद्याचा नसणारा धाक. मात्र आता वेश्यावस्तीत जाऊन वेश्येसोबत अंगसंग करणं बेकायदेशीर असल्याचा प्रस्ताव महिला आणि बलविकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वेश्या वस्तीत एखादी व्याक्ती सापडली तर त्याला पाच वर्षांची शिक्षा होणार आहे.
इममोरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेंशन ऍक्ट (आयटीपीए) अंतर्गत तयार करण्यात आनलेल्या प्रस्तावानुसार केवळ वेश्या वस्तीत जाणेच नव्हे ,तर घरी किंवा हॉटेल, लॉज इत्यादी ठिकाणी वेश्यांना नेणे, बोलावणेही बेकायदेशीर असेल. या प्ररस्तावात मानव तस्करी आणि वेश्या व्यवसाय यांच्या विरोधातील गुन्हृयांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
वेश्या वस्तीत पहील्यांदाच सापडणाऱ्या व्याक्तीला तीन महीने ते एक वर्षापर्यंत तुरुंगवास आणि १० ते २० हजार रूपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. ती व्याक्ती दुसऱ्यांदा वेश्यावस्तीत सापडल्यास तिला एक ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि २० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार आहे.
First Published: Tuesday, February 12, 2013, 15:42