6.0 तीव्रतेच्या भूकंपानं दिल्ली, कोलकाता हादरलं6.0 magnitude earthquake hits Bay of Bengal; tremors

6.0 तीव्रतेच्या भूकंपानं दिल्ली, कोलकाता हादरलं

6.0 तीव्रतेच्या भूकंपानं दिल्ली, कोलकाता हादरलं
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

उत्तर भारतासह पूर्व भारतात भूकंपाचे धक्के बसलेत. दिल्लीसह, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या काही भागांमध्ये हे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६ इतकी नोंदवण्यात आलीय.

बंगालच्या उपसागरांत त्याचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे. काही भागांमध्ये समुद्रात मोठ्या लाटा उसळल्याचंही वृत्त आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र नागरिक भयभीत झाल्यानं आपल्या घराबाहेर पडले आहेत.

सविस्तर बातमी लवकरच...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हि़डिओ

First Published: Wednesday, May 21, 2014, 23:57


comments powered by Disqus