मंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च ६ अब्ज रुपये! 6 billion rupees on ministers tours

मंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च ६ अब्ज रुपये!

मंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च ६ अब्ज रुपये!
www.24taas.com,नवी दिल्ली

माहिती अधिकारातून पुन्हा एकदा सरकारच्या उधळपट्टीची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 2010-11 मध्ये मंत्र्यांच्या विदेश दौर्या्वर केवळ 56.1 कोटी रुपये खर्च झाले होते. त्यात पुढील वर्षात तब्बल 12 पट वाढ झाली.

अग्रवाल यांनी मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाची माहिती मागवली होती. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यासाठी 2011 मध्ये सरकारने 47 कोटींची तरतूद केली होती, परंतु ही मर्यादा केव्हाच ओलांडली गेली व दौऱ्यावर 6 अब्ज रुपये खर्च झाले.

मंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च 1 अब्जाच्या वर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अशा उधळपट्टीवर तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. आणि तो कमी करावा यासाठी प्रयत्नही केले होते. मंत्र्यांनी 5 स्टार हॉटेलमध्ये बैठका घेऊ नयेत, इकॉनॉमी क्लासने प्रवास करावा अशा सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या, परंतु त्यांचंही पालन झालं नाही.

First Published: Saturday, September 29, 2012, 16:35


comments powered by Disqus