Last Updated: Thursday, February 21, 2013, 11:55
www.24taas.com, नवी दिल्ली महिलांनो तुम्हाला रेल्वेनं एक खुशखबर दिलीय. तुम्हाला रेल्वेचा लांबचा प्रवास जरा जास्तच त्रासदायक वाटतो का? होय ना... म्हणूनच रेल्वेनं प्रत्येक स्लीपर कोचमधील सहा बर्थ महिलांसाठी राखीव असतील, अशी घोषणा करून महिलांना खूश केलंय. लवकरच ही सुविधा लागू केली जाईल.
रेल्वे बोर्डाकडून सर्व कार्यालयांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. आरक्षित बर्थसाठी एकट्याने किंवा समूहाने प्रवास करणाऱ्या महिलांच्या समूहाला प्राधान्याने अग्रक्रम देण्यात येणार आहे. स्लीपर, एसी-३ आणि एसी-२ श्रेणीच्या कोचमध्ये दोन लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी तसंच ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या महिलांसाठी व एकट्याने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलांसाठी चिन्हांकित करण्यात येणार आहे.
जनरल कोचमध्येही महिला आरक्षित जागा चिन्हांकीत करण्यात येतील. महिला नसतील त्यावेळी पुरुष प्रवाशांना या जागांचा वापर करता येईल.
First Published: Thursday, February 21, 2013, 11:55