Last Updated: Saturday, April 19, 2014, 09:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सिंगापूरमधून भारतात परतणाऱ्या एका वृद्ध व्यापाऱ्याच्या पोटातून चक्क 12 सोन्याची बिस्किटे काढण्यात आली आहे. दिल्लीमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही बिस्किटे बाहेर काढलीत.
63 वर्षीय हा व्यापारी दिल्लीतील चांदनी चौकमध्ये राहत आहे. या व्यापाऱ्याच्या पोटाची शस्त्रक्रिया सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. पोटातून काढण्यात आलेल्या प्रत्येक सोन्याच्या बिस्किटाचे वजन 33 ग्रॅम एवढे असून सर्व बिस्किटे मिळून 396 ग्रॅम वजनाचे सोने पोटातून बाहेर काढल्याची माहिती डॉक्टर सी एस रामचंद्रन यांनी दिलेय. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाने दिल्ली पोलीस आणि कस्टम विभागाला माहिती दिली आहे.
12 बिस्किटे गिळण्यामागे पोलिसांना ससेमिरा टाळण्याचा या वृद्ध व्यापाऱ्याचा प्रयत्न होता. मात्र, त्याच्या तो अंगलट आलाय. पोटात ज्या व्यवृद्धाच्या पोटातून सोने काढण्यात आले ती व्यक्ती काही दिवसांपूर्वी सिंगापूरला गेली होती. तिथून परत येताना त्यांने सोन्याची बिस्किटे गिळली होती. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेला चकवण्यातही हा व्यापारी यशस्वी झाला. मात्र नंतर पोटात दुखू लागल्यामुळे नाईलाजास्तव त्याला नवी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आणि त्यानंतर त्याचे भांडेफोड झाले.
डॉक्टरांना त्यांने फसविण्याचा प्रयत्न केला. आपण चुकून धातूची छोटी वस्तू गिळल्याचे डॉक्टरांना सांगितले. पोटाचा एक्स रे काढल्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पोटात सोने सापडल्यावर डॉक्टरांना धक्का बसला. या वृद्धावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी आपण संबंधित व्यापाऱ्याला १९८९ पासून ओळखतो. त्याची मुले परदेशात स्थायिक आहेत आणि व्यापार व्यवस्थित सुरू असल्यामुळे कुटुंब आर्थिक दृष्ट्या उत्तम स्थितीत आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे त्यांनी असं का केलं, याचे कोडे आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 18, 2014, 17:00