सात वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार, 7 year old girl raped in school

सात वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार

सात वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार
www.24taas.com, पणजी

राज्यासह देशभरात अनेक बलात्काराच्या घटना घडत असताना असाच प्रकार गोव्यामध्ये घडला आहे. सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर २० वर्षाच्या नराधमाने बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मधल्या सुट्टीत सर्व मुले खेळण्यासाठी मैदानात गेले. मात्र पिडीत मुलीला इजा झाल्याने ती खेळण्यास न जाता वर्गातच बसली होती. त्यावेळी तेथे एक २० वर्षाचा तरुण आला व तिला घेऊन शौचालयाच्या बाजुला गेला. त्यानंतर तिला धमकी देऊन तिच्यावर शौचालयातच बळजबरीने बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मधल्या सुट्टीनंतर शाळा भरली असता त्या बलात्कारी तरुणानेच तिला वर्गात आणून सोडले. सदर तरुण शाळेत कसा आला याबाबत संशय आल्याने उपस्थित शिक्षिकेने सदर बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्याध्यापकांनी त्या तरुणाला काही प्रश्न ही विचारले. मात्र गुंगारा देऊन तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.

शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी वर्णन केलेल्या त्या तरुणाचा फोटो पोलिसांनी तयार केला आहे. शाळेच्या आवारात आणि विशेषकरुन मुख्याध्यापकांच्या केबिनजवळ शौचालय असताना हा गैरप्रकार घडल्याने पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना ताब्यात घेतले आहे.


First Published: Tuesday, January 15, 2013, 12:02


comments powered by Disqus