Last Updated: Friday, October 12, 2012, 12:57
www.24taas.com, चंदिगड काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी नवं वक्तव्य करून पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. पंजाबाच्या दोन दिवसांच्या दौर्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांनी आज तेथील तरुणांबाबत धक्कादायक वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे.
पंजाबातील ७० टक्के तरुण हे मादक द्रव्यांच्या आहारी गेले आहेत, असे त्यांनी येथील विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सांगितले. काँग्रेसच्या ‘एनएसयूआय’ या विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या शिबिरात ते बोलत होते.
राहुल गांधींनी ही आकडेवारी कुठून आणली? हा मात्र प्रश्न अनुउत्तरीतच राहिला.
काँग्रेसच्या युवराजांना ७० टक्के तरुण मादक द्रव्यांच्या आहारी गेल्याची आकडेवारी कुठे मिळाली, असा सवाल शिरोमणी अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल यांनी केला.
First Published: Friday, October 12, 2012, 12:43