निवडणुकीची धूम : ७५ नवीन न्यूज चॅनल्स येणार!, 75 more news tv channels coming soon

निवडणुकीची धूम : ७५ नवीन न्यूज चॅनल्स येणार!

निवडणुकीची धूम : ७५ नवीन न्यूज चॅनल्स येणार!
www.24taas.com, नवी दिल्ली

आगामी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका ब्रॉडकास्टींग क्षेत्रासाठी एक चांगली बातमी घेऊन आलीय. लोकसभा निवडणुका लक्षात घेता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तब्बल ७५ नवीन न्यूज चॅनल्सना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

सध्या भारतात तब्बल ४३० न्यूज चॅनल्स आहेत. जगभरातल्या इतर देशांपेक्षा ही संख्या निश्चितच कित्येक पटीनं मोठी आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास १५० चॅनल्सनं प्रसारणाचे हक्क मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. ते सध्या क्लिअरन्सची वाट पाहत आहेत. त्यापैकी जवळजवळ निम्मे चॅनल्स हे न्यूज आणि सद्य घडामोंडीवर आधारित आहे.

या ७५ न्यूज चॅनल्समध्ये इंग्रजी, हिंदीसहीत अनेक प्रादेशिक भाषांचाही समावेश आहे.

First Published: Tuesday, March 5, 2013, 12:14


comments powered by Disqus