केंद्रीय कर्मचाऱ्यांना `महागाई`चा फायदा होणार?, 8% DA hike likely for central government employees

केंद्रीय कर्मचाऱ्यांना `महागाई`चा फायदा होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना `महागाई`चा फायदा होणार?
www.24taas.com, नवी दिल्ली

केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्तायत (डीए) आठ टक्के वाढ करण्याची तयारी केलीय. यामुळे महागाईच्या या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. याचा लाभ केंद्र सरकारचे सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ३० लाख पेन्शनर्सना होईल. यापूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये डीएमध्ये सात टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता सध्याच्या ७२ टक्क्यांवरून वाढवून ८० टक्के करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता आठ टक्क्याने वाढवून ८० टक्के करण्याच्या अर्थ मंत्रालयाच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळ उद्या होणार्याम बैठकीत विचार करू शकते. ही वाढ १ जानेवारी २०१३ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊन कर्मचारी आणि पेन्शनर्सना त्याची थकबाकी मिळू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जर एखाद्या कर्माचाऱ्याचं मूळ वेतन १०००० रुपये आहे तर त्याला अधिक ८०० रुपये डीएच्या स्वरुपात मिळतील.

First Published: Tuesday, April 2, 2013, 10:19


comments powered by Disqus